भूमी अभिलेख विभाग पुणे (Department of Land Records Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bhumi Abhilekh Vibhag Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.
भूकरमापक तथा लिपिक या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे.
Table of Contents
या पदांसाठी भरती
भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) – एकूण जागा 163
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
भूकरमापक तथा लिपिक
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यलयातुन शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी 30 WPM किंवा 40 WPM पर्यंत टायपिंग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि कम्प्युटर टायपिंग येणं अनिवार्य आहे.
उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) – 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज सुरु होण्याची तारीख – 09 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021
परीक्षेची तारीख – 23 जानेवारी 2022
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/1035/Home या लिंकवर क्लिक करा