नवोदय विद्यालय समितीमध्ये (Navodaya Vidyalaya Samiti) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. नवोदय विद्यालय समितीमध्ये शिक्षकेतर पदाच्या 1925 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. नवोदय विद्यालय समितीमध्ये गट अ, गट ब आणि गट क प्रवर्गाच्या पदांसाठी अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पात्र उमेदवारांनी नवोदय विद्यालय समितीच्या navodaya.gov.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. सहायक आयुक्त गट अ, ज्युनिअर सेक्रेटरिएट सहायक, स्टाफ नर्स (महिला), स्टेनोग्राफर गट क, कॉम्प्युटर ऑपरेटर, केटरिंग असिस्टंट. ज्युनिअर सेक्रेटरिएट आर ओ केडर, ज्युनिअर सेक्रेरटरिए सहायक (जेएनवी केडर), इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर, आणि इतर पदांसाठी जवाहर नवोदय विद्यालयानं अर्ज मागवले आहेत. निवड झालेल्या उमदेवारांना जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या देशभरातील शाळा आणि केंद्रांवर नोकरी करावी लागेल.
Table of Contents
अर्ज कधीपर्यंत सादर करायचा?
नवोदय विद्यालय समितीमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमदेवारांना 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करण्याची संधी आहे. अर्ज सादर केल्यानंतर त्याची छाननी करण्यात येईल. यानंतर उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली जाईल. कॉम्प्युटर बेसड टेस्टचं आयोजन 9 मार्च आणि 11 मार्च रोजी करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 10 फेब्रुवारी 2022
अर्जाचं शुल्क सादर करण्याचा अंतिम दिनांक : 10 फेब्रुवारी 2022
किती जागांवर भरती होणार?
1925
पदांचा तपशील
सहायक आयुक्त गट अ, ज्युनिअर सेक्रेटरिएट सहायक, स्टाफ नर्स (महिला), स्टेनोग्राफर गट क, कॉम्प्युटर ऑपरेटर, केटरिंग असिस्टंट. ज्युनिअर सेक्रेटरिएट आर ओ केडर, ज्युनिअर सेक्रेरटरिए सहायक (जेएनवी केडर), इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर या पदांसाठी अर्ज सादर करता येतील.
पात्रता
नवोदय विद्यालय समितीनं जारी केलेल्या पत्रकानुसार दहावी ते पदवी अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. उमेदवारांनी नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाईटला भेट देऊन अधिकृत जाहिरात पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 18 ते 45 दरम्यान वय असणं आवश्यक आहे. तर, पदानुसार निवड झालेल्या उमदेवारांना 18 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत वेतन दिलं जाईल.