10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी

बँक ऑफ इंडिया कोल्हापूर आणि सांगली (Bank of India Kolhapur and sangli) इथे लवकरच दहावी उत्तीर्ण उमेदवरांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bank of India Kolhapur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

कार्यालयीन सहाय्यक, परिचर या पदांसाठी ही भरती (Bank Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) – एकूण जागा 03

परिचर (Attendant) – एकूण जागा 01

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवरांनी पदवीपर्यँतनशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवरांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना बँकेतील खात्यांसंदर्भात माहिती असणं आवश्यक आहे.

परिचर (Attendant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) – या पदांसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळणार आहे.

परिचर (Attendant) – या पदांसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना 8,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळणार आहे.

अशी होणार निवड

पात्र असणाऱ्या आणि अर्ज पाठवण्यात आलेल्या उमेदवारांची सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

त्यानंतर लेखी परीक्षेतून निवडण्यातनं आलेल्या निवडक उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, १५१९ सी, जयधवल, बिल्डींग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bankofindia.co.in/ या लिंकवर क्लिक करा

2 thoughts on “10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी”

Leave a Comment