उमेदवारांनो BEL कंपनीत नोकरीची ही संधी सोडू नका

 भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BEL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

प्रोजेक्ट इंजिनिअर, ट्रेनी इंजिनिअर, ट्रेनी ऑफिसर या पदांसाठी भरती (Government jobs in India) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

या पदांसाठी भरती  

प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer) – एकूण जागा 67

ट्रेनी इंजिनिअर (Trainee Engineer) – एकूण जागा 169

ट्रेनी ऑफिसर (Trainee Officer) – एकूण जागा 11

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer) –

मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/महाविद्यालयातून संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी (बीई)/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक)/बॅचलर ऑफ सायन्स (बीएससी) 4 वर्षांचा अभ्यासक्रम अभियांत्रिकी पदवीसह किमान 2 वर्षांचा संबंधित औद्योगिक पोस्ट पात्रता अनुभव असणं आवश्यक आहे.

ट्रेनी इंजिनिअर (Trainee Engineer) –

55% एकूण गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/महाविद्यालयातून संबंधित विषयातील B.Tech/B.E/B.Sc 4 वर्षांचा अभ्यासक्रम अभियांत्रिकी पदवीसह किमान सहा महिन्यांचा संबंधित औद्योगिक पोस्ट पात्रता अनुभव असणं आवश्यक आहे.

ट्रेनी ऑफिसर (Trainee Officer) –

55% एकूण गुणांसह नामांकित विद्यापीठ/संस्था/महाविद्यालयातून वित्त विषयात दोन वर्षांचा MBA सह किमान सहा महिन्यांचा संबंधित पोस्ट पात्रता अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer) – 40,000 – 55,000 रुपये प्रतिमहिना

ट्रेनी इंजिनिअर (Trainee Engineer) – 30,000 – 40,000 रुपये प्रतिमहिना

ट्रेनी ऑफिसर (Trainee Officer) – 30,000 – 40,000 रुपये प्रतिमहिना

अशी होणार निवड

संबंधित पात्रता, पात्रता नंतरच्या अनुभवाच्या संदर्भात पात्र निकष पूर्ण करणारे उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना अर्ज शुल्क देखील भरावे लागेल, प्रकल्प अभियंत्यांना ₹500 भरावे लागतील, तर प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना ₹200 भरावे लागतील. टीप: अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि बेंचमार्क अपंग व्यक्ती (PwBD) श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment