10वी उत्तीर्णांनो, देशसेवा करण्याची मोठी संधी… BSF मध्ये तब्बल 2788 जागांसाठी भरती

सीमा सुरक्षा बल (Border Security Force Recruitment) इथे लवकरच दहावी उत्तीर्ण उमेदवारांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BSF Tradesman Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

कांस्टेबल ट्रेडमॅन या पदांसाठी ही भरती (10th passed jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (How to apply for BFS recruitment 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

Border Security Force Recruitment

या पदांसाठी भरती   

कांस्टेबल ट्रेडमॅन (Constable Tradesman) – एकूण जागा 2788

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कांस्टेबल ट्रेडमॅन (Constable Tradesman)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त किंवा शासनमान्य संस्थेच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना दोन किंवा एक वर्षाचा संबंधित ट्रेडमधील अनुभव आवश्यक आहे.

किंवा उमेदवारांनी ट्रेडमधील ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी निवडीसाठीच्या सर्व अटी शर्थी आणि पात्रता पूर्ण करणं आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता

उंची : पुरुष = 167.5 सेमी आणि महिला = 157 सेमी.

छाती (केवळ पुरुषांसाठी): 78-83 सेमी.

अनुसूचित जाती/जमाती/आदिवासी-

उंची : पुरुष = 162.5 सेमी आणि महिला = 155 सेमी.

छाती (केवळ पुरुषांसाठी): 76-81 सेमी.

डोंगराळ भागातील उमेदवार-

उंची : पुरुष = 165 सेमी आणि महिला = 150 सेमी.

छाती (केवळ पुरुषांसाठी): 78-83 सेमी

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 वर्षे ते 23 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

कांस्टेबल ट्रेडमॅन (Constable Tradesman) – 21,700/- – 69,100/- रुपये प्रतिमहिना

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी – 100/- रुपये

मागासवर्गीयांसाठी – निःशुल्क

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.bsf.nic.in/ या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment