CBI मुंबईमध्ये या पदांसाठी करतेय भरती….. तब्बल 40,000 मिळेल पगार

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मुंबई (Central Bureau Of Investigation Mumbai Jobs) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CBI Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सल्लागार या पदांसाठी ही भरती (Central government jobs in Mumbai) असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज (How to apply for CBI Jobs) करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती  

सल्लागार (Consultant) – एकूण जागा 04

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सल्लागार (Consultant)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी सेवानिवृत्त असणं आबश्यक आहे.

उमेदवारांना पोलीस निरीक्षक किंवा त्याहून मोठ्या पदावरून निवृत्त असणं आवश्यक आहे.

कामाचा अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

पोलीस निरिक्षक किंवा त्यावरील पदांवर असताना कायद्याचा आणि कामाचा अनुभव असणं आवश्यकी आहे.

तसंच उमेदवारांना कायदा, कोर्ट, कोर्टाचं कामकाज आणि पैरवी याबाबत शंखोल अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 40,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे. यासोबत इतर सुविधाही दिल्या जाणार आहेत.

अशी होणार उमेदवारांची निवड

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सुइरुवातील ऑनलाईन किंबवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. यानंतर उमेदवारांच्या अनुभवानुसार आणि पात्रतेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. निवड किंवा शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीला बोलवण्यात येणार आहे. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ ई-मेल आयडी

शाखा प्रमुख सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँटी करप्शन शाखा 9वा मजला, सी-35ए, जी-ब्लॉक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 098 / [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2022

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://cbi.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment