मध्य रेल्वे भुसावळ विभाग इथे विविध पदांसाठी भरती….. 64,000 रुपये मिळणार पगार

मध्य रेल्वे भुसावळ विभाग (Central Railway Divisional Railway Hospital Bhusawal) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Railway Bhusawal Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

सुपर स्पेशालिस्ट आणि स्पेशलिस्ट या पदांसाठी ही भरती (Central Railway Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

सुपर स्पेशालिस्ट (Super Specialist)

स्पेशलिस्ट (Specialist)

एकूण जागा – 09

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सुपर स्पेशालिस्ट (Super Specialist) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना दहा ते बारा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

स्पेशलिस्ट (Specialist) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना तीन ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

सुपर स्पेशालिस्ट (Super Specialist) – वयवर्षे 30 – 64 दरम्यान

स्पेशलिस्ट (Specialist) – वयवर्षे 30 – 64 दरम्यान

इतका मिळणार पगार

सुपर स्पेशालिस्ट (Super Specialist) – 64,000/- रुपये प्रतिमहिना

स्पेशलिस्ट (Specialist) – 52,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ ई-मेल आयडी

[email protected] / CMS कार्यालयात, विभागीय रेल्वे रुग्णालय भुसावळ

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://cr.indianrailways.gov.in/या लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment