वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ पदांसाठी Vacancy

 जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा (Collector Office Wardha) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jilhadhikari Karyalay Wardha Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विशेष सहायक सरकारी अभियोक्ता या पदांसाठी भरती (Collector Office Wardha Jobs) असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती  

विशेष सहायक सरकारी अभियोक्ता (Special Assistant Public Prosecutor) – एकूण जागा 07

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

विशेष सहायक सरकारी अभियोक्ता (Special Assistant Public Prosecutor)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विधी किंवा कायद्याचं शिक्षण पदवीपर्यंत घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवार हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे सदस्य म्हणून नोंदणीकृत असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना किमान पाच वर्षांचा फौजदारी प्रकरणं सांभाळायचं अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागास्वर्गोय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.

काही महत्त्वाच्या सूचना

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे.

उमेदवार हे वकील संघाचे सदस्य असणं आवश्यक आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना शासनाविरुद्ध कोणतीही फौजदारी केस लढता येणार नाही.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय (गृह विभाग), वर्धा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 फेब्रुवारी 2022

पात्र उमेदवारांची यादी जाहीर होण्याची तारीख – 10 फेब्रुवारी 2022

कागदपत्र पडताळणीची तारीख – 14 फेब्रुवारी 2022

अंतिम निवड यादीची तारीख – 15 फेब्रुवारी 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wardha.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment