राष्ट्रीय संस्थेत तब्बल 42,000 रुपये पगाराची नोकरी…वाचा सविस्तार

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (National Environmental Engineering Research Institute) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NEERI Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

प्रकल्प सहयोगी -I, प्रकल्प सहयोगी -II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी या पदांसाठी ही भरती (Government jobs in Nagpur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार 22, 23 आणि 25 जानेवारी 2022 असणार आहे.

NEERI requirements

या पदांसाठी भरती

प्रकल्प सहयोगी -I (Project Associate-I)

प्रकल्प सहयोगी -II ( Project Associate-II)

वरिष्ठ प्रकल्प सहयोगी

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्रकल्प सहयोगी -I (Project Associate-I) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रकल्प सहयोगी -II ( Project Associate-II) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बायोटेक्नॉलॉजीमध्ये M.Sc./B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये B.E/B.Tech आणि इन्स्ट्रुमेंटेशन / रासायनिक अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

प्रकल्प सहयोगी -I (Project Associate-I) – 25,000/- रुपये प्रतिमहिना + HRA

प्रकल्प सहयोगी -II ( Project Associate-II) – 35,000/- रुपये प्रतिमहिना + HRA

वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) – 42.000/- रुपये प्रतिमहिना + HRA

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

प्रकल्प सहयोगी -I (Project Associate-I) – 23-01-2022

प्रकल्प सहयोगी -II ( Project Associate-II) – 25-01-2022

वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) – 22-01-2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://recruitment.neeri.res.in/RecruitmentV3/applicationForm.jsp या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment