IDBI बँक मुंबई इथे ‘या’ पदांसाठी नोकरी 60 लाख रुपये प्रतिवर्षी पगार…लगेच करा अर्ज

IDBI बँक मुंबई (IDBI Bank Limited) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IDBI Bank Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल), मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल) (Deputy Chief Technology Officer (Channels))

मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (Chief Information Security Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल) (Deputy Chief Technology Officer (Channels)) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बँकांमध्ये ग्राहकाभिमुख मोबाइल उत्पादने किंवा आर्थिक संस्था. डिजिटल बँकिंगमध्ये अनुभव असणं आवश्यक.

मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (Chief Information Security Officer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पूर्ण-वेळ मास्टर्स किंवा बॅचलर पदवी अभियांत्रिकीमध्ये अनुभव आणि शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

इतका मिळणार पगार

उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल) (Deputy Chief Technology Officer (Channels)) – 40 ते 46 लाख रुपये प्रतिवर्ष

मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (Chief Information Security Officer) – 50 ते 60 लाख रुपये प्रतिवर्ष

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी

[email protected]

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.idbibank.in/ या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment