भारतीय वायू सेनेत ‘ग्रुप सी’ मधील या पदांसाठी भरती

भारतीय वायू सेनेतील विविध एअर फोर्स स्टेशन आणि यूनिटमधील ग्रुप सी मधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

इंडियन एअर फोर्सनं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं 30 दिवसात अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत जाहिरात वाचून घेणं आवश्यक आहे.

Table of Contents

पदांचा तपशील

लोअर डिव्हिजनल क्लार्क (12),मल्टी टास्किंग स्टाफ (18), अधीक्षक (1), सिव्हिलीयन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (45), कुक (5), कारपेंटर (1) आणि फायरमन या पदासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारांना लेव्हल 2 अंतर्गत पगार दिला जाईल.

पात्रता

लोअर डिव्हिजनल क्लार्क पदासाठी 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मल्टी टास्किंग स्टाफ, सिव्हिलीयन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, कुक, कारपेंटर आणि फायरमन या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर, अधीक्षक पदासाठी उमेदवार उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर, वयोमर्यादा 18 ते 25 दरम्यान असणं आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?

भारतीय वायूदलातील लोअर डिव्हिजनल क्लार्क ,मल्टी टास्किंग स्टाफ , अधीक्षक , सिव्हिलीयन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर , कुक , कारपेंटर आणि फायरमन या पदासाठी निवड लेखी परीक्षा,प्रात्याक्षिक, फिजीकल, स्किल टेस्ट या प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. इंडियन एअर फोर्सकडून जारी करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्यावर उमदेवारांनी अर्ज पाठवून देणं आवश्यक आहे.

Leave a Comment