भारतीय बँकांमध्ये 7855 जागांसाठी भरती …. लगेच करा अर्ज

इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्‍शन (IBPS) ने 7000 हून अधिक जागांवर क्लार्क पदासाठी भरती आयोजित केली आहे.

यासाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 27 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

या भरतीमध्ये बँक ऑफ इंडिया. कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसिज बँक, युको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रसह 11 बँकांमध्ये क्लार्क भरले जाणार आहेत.

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट ibps.in वर भेट देऊ शकतात. तसेच नोटिफिकेशन डाऊनलोड करू शकतात. एकूण 7855 क्लार्कच्या जागा आहेत. या भरतीसाठीचे रजिस्ट्रेशन 7 ऑक्टोबरपासून सुरु झाले आहे.

ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख ही 27 ऑक्टोबर आहे. उमेदवारांची निवड ही ऑनलाईन प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 20 ते 28 वर्षे असाया हवे. कोणत्याही विषयातून पदवी घेतलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत.

आरक्षणात येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क 175 रुपये आणि सामान्य उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क आहे. अधिक माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन तपासावे.

Leave a Comment