भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी 1785 पदांसाठी भरती

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) दक्षिण-पूर्व रेल्वेअंतर्गत विविध विभागांमध्ये (Indian Railways Recruitment 2021) अप्रेंटिस पदांवर भरती केली जाणार आहे.

यासाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. उमेदवारrrcser.co.inया अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2021 आहे.

उमेदवार https://www.rrcser.co.in या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी अर्ज करू शकतात. https://appr-recruit.co.in/2021-22Aprt/Notification.pdf या लिंकवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 1785 पदं भरली जाणार आहेत. अप्रेंटिस पदांसाठी 15 नोव्हेंबर 2021 पासून ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 14 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.

या जागा भरण्यात येणार आहेत –

खरगपूर कार्यशाळेत 360 पदांची भरती

सिग्नल आणि दूरसंचार (कार्यशाळा)/खरगपूर येथे 87 पदांची भरती

ट्रॅक मशीन वर्कशॉप/खरगपूर 120 पदं

एसएसई (वर्क्स) अभियांत्रिकी/खरगपूर – 28 जागा

कॅरेज आणि वॅगन डेपो/खरगपूर – 121 जागा

डिझेल लोको शेड/खरगपूर – 50 जागा

सीनियर डी (जी) / खरगपूर – 90 जागा

टीआरडी डिपो/इलेक्ट्रिकल/खरगपूर – 40 जागा

ईएमयू शेड/इलेक्ट्रिकल/टीपीकेआर – 40 जागा

इलेक्ट्रिक लोको शेड/संतरागाछी – 36 जागा

सीनियर डीईई (जी) / चक्रधरपुर – 93 जागा

इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन डेपो/चक्रधरपूर – 30 जागा

कॅरेज आणि वॅगन डेपो/चक्रधरपूर – 65 जागा

इलेक्ट्रिक लोको शेड/टाटा – 72 जागा

अभियांत्रिकी वर्कशॉप/सिनी – 100 जागा

ट्रॅक मशीन वर्कशॉप/सिनी – 7 जागा

एसएसई (वर्क्स)/अभियांत्रिकी /चक्रधरपूर – 26 जागा

इलेक्ट्रिक लोको शेड/बोंडामुंडा – 50 जागा

डीझेल लोको शेड/बोंडामुंडा – 52 जागा

सीनियर डीईई (जी)/आद्रा – 30 जागा

कॅरेज आणि वॅगन डेपो/आद्रा – 30 जागा

कॅरेज आणि वॅगन डेपो/आद्रा – 65 जागा

डीझेल लोको शेड/बीकेएससी – 33 जागा

टीआरडी डिपो/इलेक्ट्रिकल/एडीआरए – 30 जागा पद

इलेक्ट्रिक लोको शेड/बीकेएससी – 31 जागा

फ्लॅश बट वेल्डिंग प्लांट/झारसुगुडा- 25 जागा

एसएसई (वर्क्स)/अभियांत्रिकी /एडीआरए – 24 जागा

कॅरेज आणि वॅगन डेपो रांची – 30 जागा

सीनियर डीईई (जी)/रांची – 30 जागा

टीआरडी डिपो/इलेक्ट्रिकल/रांची – 10 जागा

एसएसई (वर्क्स)/इंजीनियरिंग/रांची – 10 जागा

पात्रता : जाहीर केलेल्या नोटीसनुसार, अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसंच त्याच्याकडे आयटीआय उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्रदेखील असावं. उमेदवारांची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान (सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणीतल्या उमेदवारांना वयात सूट) असावी. शिवाय, उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागणार आहे.

Leave a Comment