Railway Recruitment : कोकण रेल्वेत इंजिनिअर्सच्या 139 जागांसाठी भरती…. लगेच करा अर्ज

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) इथे लवकरच इंजिनिअर्सच्या 139 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना ( Railway Recruitment ) जारी करण्यात आली आहे.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice)
तंत्रज्ञ अप्रेंटिस (Technician Apprentice)
एकूण जागा – 139
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) –

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंगच्या फिल्डमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त म्हजविद्यालयातून डिग्री घेतली असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ अप्रेंटिस (Technician Apprentice) –

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंगच्या फिल्डमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त म्हजविद्यालयातून डिग्री घेतली असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदभरतीसाठी उमेदवाराचं वय 18-25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे. तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे.

इतका मिळणार Stipend

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी – 4984/- रुपये प्रतिमहिना

डिप्लोमा उमेदवारांसाठी – 3542/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://konkanrailway.com/ या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment