महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक इथे ‘या’ पदांसाठी नोकरी…..आजच करा अप्लाय

महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक (Maharashtra Police Academy Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maharashtra Police Academy Nashik Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे.

विधी निदेशक या पदांसाठी ही भरती (Maharashtra Police Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती    

विधी निदेशक (Law Instructor) – एकूण जागा 21

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

विधी निदेशक (Law Instructor) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी LAW मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

विधी निदेशक (Law Instructor) – 9,300/- – 34,800/- रुपये प्रतिमहिना

काही महत्त्वाच्या सूचना

ही पदभरती अकरा महिन्याच्या कंत्राटी तत्वावर घेण्यात येणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबकरोड, नाशिक 422007

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2022

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpanashik.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment