महावितरण औरंगाबाद 10वी पास उमेदवारांच्या इथे 90 जागांसाठी भरती

महावितरण औरंगाबाद (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) 10वी पास उमेदवारांच्या 90 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahavitaran Aurangabad Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

अपरेंटिस (इलेक्ट्रिकल / वायरमन) या पदांसाठी ही भरती (MSEB Recruitment 2021)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

अपरेंटिस (इलेक्ट्रिकल / वायरमन) (Apprentice) – एकूण जागा 90

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अपरेंटिस (इलेक्ट्रिकल / वायरमन) (Apprentice) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून संबंधित ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी नोटीफिकेशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण औरंगाबाद , प्लॉट क्र. जे – १३ गरवारे स्टेडियम समोर, एम. आय. डी. सी. चिकलठाणा औरंगाबाद.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 डिसेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment