MPSC तर्फे ‘या’ पदांसाठी पदभरती जाहीर…… पात्र असाल तर लगेच करा अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) इथे लवकरच विमा अधिकारी पदांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

विमा सहायक संचालक, विमा उप संचालक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी या पदांसाठी ही भरती (MPSC jobs Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

विमा सहायक संचालक (Assistant Director of Insurance)

विमा उप संचालक (Deputy Director of Insurance)

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (District Soldier Welfare Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

विमा सहायक संचालक (Assistant Director of Insurance) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Arts, Science, Commerce किंवा Law मध्ये पदवीपर्यँतय शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवरांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

विमा उप संचालक (Deputy Director of Insurance) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Arts, Science, Commerce किंवा Law मध्ये पदवीपर्यँतय शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवरांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (District Soldier Welfare Officer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सैन्यात मेजर आणि त्याहून अधिक पद किंवा नौदलात किंवा हवाई दलात काम केलं असणं आवश्यक आहे.

तसंच सेवानिवृत्त अधिकारीही अर्ज करू शकणार आहेत.

परीक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी – 719/- रुपये

मागासवर्गासाठी – 449/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment