मुंबई महानगरपालिकेत 1 लाख पगाराची नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई (Municipal Corporation of Greater Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

सहाय्यक प्राध्यापक, गृहस्थ (औषध) या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 आणि 18 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती  

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – एकूण जागा 14

गृहस्थ – औषध (Houseman Medicine) – एकूण जागा 09

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

सुपर स्पेशालिटीसाठी उमेदवारांनी DM/M.Ch.पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी MSCIT किंवा तस्सम कम्प्युटरचा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून, शैक्षणिक संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

गृहस्थ – औषध (Houseman Medicine) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी MSCIT किंवा तस्सम कम्प्युटरचा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून, शैक्षणिक संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

गृहस्थ – औषध (Houseman Medicine) – 27,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई – 400008

गृहस्थ – औषध (Houseman Medicine) – वैद्यकीय अधीक्षक, संसर्गजन्य रोगांसाठी कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-400011

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी 2022 आणि 18 जानेवारी 2022

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment