10 वी आणि 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नेव्हीमध्ये 2500 पदांची भरती ……

भारतीय नौदलामध्ये २,५०० हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. आर्टिफिशर अप्रेंटिस (AA)ची ५०० आणि सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) ची २००० पदे भरली जाणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एए आणि एसएसआर पदांसाठी केवळ अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.

भारतीय नौदल (Indian Navy Vacancy 2021) अंतर्गत आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) – फेब्रुवारी 2022 बॅच करिता एकूण 25oo रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.

नोटिफिकेशननुसार, दहावी (१०+२) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे १० हजार उमेदवारांची एक छोटी यादी तयार केली जाईल. १० हजार शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी चाचणी आणि आरोग्य चाचणीसाठी बोलावले जाईल. लेखी आणि वैद्यकीय परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची निवड आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) या पदांसाठी केली जाईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पदाचे नाव – आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) – फेब्रुवारी 2022 बॅच
पद संख्या – 2500 जागा
शैक्षणिक पात्रता – Qualified in 10+2 Examination
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 ऑक्टोबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021
अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

2 thoughts on “10 वी आणि 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नेव्हीमध्ये 2500 पदांची भरती ……”

Leave a Comment