TATA च्या ‘या’ कंपनीत नोकरीची संधी महाराष्ट्रत जागा उपलब्ध

TATA ग्रुप आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. TATA ग्रुप जगात सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा अनेकविध क्षेत्रात TATA ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

कोरोना संकटानंतर आता हळूहळू बहुतांश क्षेत्रे सावरताना दिसत असून, अनेकविध कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. यातच आता TATA च्या एका कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध असून, पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, असे सांगितले जात आहे.

देशातील प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपनी Tata Motors मध्ये सिनिअर मॅनेजरच्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी बिझनेस कम्युनिकेशन पोस्टवर ऑनलाइन अर्जाची लिंक देण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेत सहभागी असलेले उमेदवार https://careers.tatamotors.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या वेबसाइटवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या भरती प्रक्रियेत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आहे. उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

Tata Motors मध्ये सिनिअर मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दिलेल्या माध्यमांद्वारे व्यवसायासाठी समग्र संप्रेषण उपाय करणे तसेच व्यवसायात भागीदारी वाढवण्याची जबाबदारी घ्यावी लागेल, असे म्हटले जात आहे.

तसेच बाह्य आणि अंतर्गत व्यक्तींशी उत्तम संपर्क ठेवून समोर येणाऱ्या संधी आणि आव्हानांसाठी सिद्ध असणे गरजेचे आहे. कंपनी आणि ब्रँडचा सकारात्मक ठसा उमटवण्यासाठी उमेदवाराला योजना आणि अंमलबजावणी करावी लागेल. संबंधित प्रवक्त्यांना मार्गदर्शन करावे लागेल, असे सांगितले जात आहे.

सिनिअर मॅनेजरला ब्रँड, उत्पादन आणि व्यावसायिक यशांच्या सतत कव्हरेजसाठी योग्य संवाद दिनदर्शिका तयार करण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. अर्जदाराने नियमितपणे कंपनी आणि उद्योगावरील अहवालांचे निरीक्षण आणि विश्लेषण केले पाहिजे.

उदयोन्मुख ट्रेंडचा फायदा करून घेतला पाहिजे. तसेच व्यवसाय आणि उत्पादनांसाठी योग्य सूचना, सल्ले देणे आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापकाला Tata Motors च्या उपस्थितीसह आणि महत्त्वाच्या बाजारपेठा असलेल्या शहरांवर भर देऊन देशभरातील सर्व संबंधित पत्रकार आणि प्रभावकांचा अपडेट डेटाबेस ठेवावा लागेल.

टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://careers.tatamotors.com करिअर पेजला भेट द्या आणि नोकरीची सूचना तपासा किंवा या पेजमध्ये दिलेली लिंक वापरा. हे तुम्हाला अर्ज पृष्ठावर घेऊन जाईल. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. अर्ज सादर करा, असे सांगितले जात आहे.

Leave a Comment