ताण दूर करण्यासाठी वापरा हे घरगुती उपाय…. नक्की वाचा

आपण आपल्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. घरचे काम आणि आॅफिसचे काम करत असताना आपल्याला बऱ्याच वेळा ताण येतो. हा ताण टाळण्यासाठी आपण वेब सीरिज किंवा टिव्ही वगैरे बघतो. हे केल्याने आपण थोड्यावेळासाठी तरी आपण ताण विसरतो. जरी या सर्व गोष्टी केल्याने तणाव दूर होत नाही तरी देखील थोडा वेळ चांगले वाटते.

आपण आपल्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. घरचे काम आणि आॅफिसचे काम करत असताना आपल्याला बऱ्याच वेळा ताण येतो. हा ताण टाळण्यासाठी आपण वेब सीरिज किंवा टिव्ही वगैरे बघतो. हे केल्याने आपण थोड्यावेळासाठी तरी ताण विसरतो. जरी या सर्व गोष्टी केल्याने तणाव दूर होत नाही तरी देखील थोडा वेळ चांगले वाटते. तणाव कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय देखील करत आहे. मात्र, तणाव कमी करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, हे आपण बघणार आहोत.

मेडिटेशन करा

ताण टाळण्यासाठी दररोज 5 ते 10 मिनिटे मेडिटेशन करा. तुम्ही अशा ठिकाणी ध्यान करा जेथे शांतता आहे. हे नियमितपणे केल्याने तुम्ही तणावमुक्त राहाल. या व्यतिरिक्त, ताण आणि चिंतेची पातळी कमी होते.

ब्लूबेरी बेरी

ब्लूबेरी बेरी हे फळ दिसण्यासाठी छोटे असले तरी यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी जास्त असते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपल्या शरीरास पेशी निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटची आवश्यकता असते. असा वेळा आपण ब्लूबेरी बेरीचे सेवन केले पाहिजे.

प्राणायाम करा

ताण आणि तणाव दूर करण्यासाठी दररोज थोडा वेळ प्राणायाम करा. हा व्यायाम नियमितपणे केल्याने तुम्हाला आराम वाटेल. हे दररोज केल्याने तुमचे चयापचय सुधारते.

पुरेशी झोप घ्या

दररोज वेळेवर झोपा आणि सकाळी फिरायला जा. तुमच्या दैनंदिन दिनक्रमात या गोष्टी केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल दिसतील. झोपेच्या 3 ते 4 तास आधी मोबाईल आणि टीव्ही वापरणे बंद करा.

अश्वगंधा

अश्वगंधा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. जी आपला शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही आपल्या आहारात अश्वगंधाचा समावेश अनोख्या पद्धतीने करू शकता. यासाठी तुपामध्ये एक चमचा अश्वगंधा पावडर मिसळावे. नंतर त्यात खजूर, मध, गूळ किंवा साखर घाला. ही पेस्ट दुधात मिक्स करून दिवसातून एकदा प्या. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

Leave a Comment